औरंगाबाद- सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून दीड वर्षांपूर्वीच लग्न झालेल्या २१ वर्षीय विवाहितेने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना मोंढा परिसरात घडली. सुम्मया शिरीन इम्रोज खान वय २१ वर्ष (रा.जुनामोंढा) असे मारीत महिलेचे नाव आहे.
मृत सुम्मयाचा सुमारे दीड वर्षांपूर्वी शहरातील मोंढा भागातील खान परिवारात लग्न झाले होते. तेंव्हापासून सासू आणि नणंद यांच्या कडून सतत त्रास देणे सुरू होते.या सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी स्वतःला जाळून घेतले होते. उपचारादरम्यान आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास विवाहितेचा मृत्यू झाला या प्रकरणी सासरच्या मंडळी विरोधात क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र जोपर्यंत आरोपी सासरच्या मंडळीना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारपर्यंत नातेवाईक आपल्या भुमुकेवर ठाम होते.